top of page

सल्लागारांचे छुपे डावपेच


सामान्य नागरीक गुंतवणूक करतांना सल्लागाराची का मदत घेतात याची खालील कारणे आहेत:-


१. त्यांना गुंतवणूक कुठे, कशी व किती करावी याबद्दल हवं तितकं ज्ञान नसतं

२. किंवा ज्ञान असेल तरी वेळ नसतो

३. किंवा ज्ञान आणि वेळ दोन्ही असेल तरीही सल्लागार आपल्यापेक्षा चांगला सल्ला देईल हा विश्वास असतो


त्यामुळे सल्लागारावर पूर्णपणे विश्वास ठेऊन ते आपली घामाची कमाई त्याच्या हाती सोपवतात. आपली आयुष्याची कमाई दुसऱ्या कोणाकडे सांभाळायला देणं हे इतकं सोपं नसतं. खूप विचारपूर्वक सल्लागाराची निवड करावी लागते. पैसे बुडणार तर नाहीत ना? गुंतवल्यावर या व्यवहारात तोटा तर होणार नाही ना? माझे पैसे पाहिजे तेंव्हा मला परत मिळतील ना? एक ना अनेक प्रश्न या निर्णयापूर्वी आपण स्वतःलाच विचारले पाहिजेत. आणि मग सगळा विचार करूनच आपल्या सल्लागाराची निवड केली पाहिजे.


त्यामुळे सल्लागार निवडतांना मुख्यत्वे करून खालील बाबी लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे:-

1. तो एक माणूस म्हणून विश्वास ठेवण्यायोग्य आहे का?

2. तुम्ही त्याला स्वतः ओळखता का?

3. त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात काही तफावत आहे का?

4. त्याची नैतिकता किती उच्च पातळीची आहे ?

5. तुम्ही त्याला भेटून तुमच्या शंकांचे निरसन करू शकता का?

6. तुमचे पैसे योग्य जागी गुंतवले जातीलच याची तुम्हाला खात्री आहे का?

7. गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातल्या संभाव्य धोक्याबद्दल त्याने तुम्हाला सावधगिरीचा ईशारा वेळोवेळी दिला आहे का?


या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली तरच तुम्ही त्या सल्लागाराला तुमचे पैसे देऊ शकता. पण हि गोष्ट इथेच संपत नाही. कारण सल्लागारांचे अनेक अजाण पैलू आहेत. जे बहुतांश गुंतवणूकदारांना माहित नसतात. त्यामुळे ते योग्य सल्लागार निवडण्यात चूक करतात.


कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये सामान्य लोकांचा कल खुप वाढला आहे. कोरोनात बाजार खाली घसरल्यावर ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्या लोकांना अजूनही त्याचा चांगलाच लाभ होत आहे. हे पाहून बरेच नवीन गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. घाईत आहेत. याचा गैरफायदा काही कंपन्यांचे सल्लागार उचलत आहेत. त्या तशा सल्लागारांना काही म्युच्युअल फंडही साथ देत आहेत. आज शेअर बाजारात फंड विकणाऱ्यांची गर्दी झालेली आहे. म्युच्युअल फंडांना आपले ऍसेट अंडर मॅनॅजमेन्ट (AUM) वाढवायचे आहे. आपली विक्री वाढवायची आहे. आणि यासाठी ते विक्रीच्या वेगवेगळ्या योजना सतत राबवत राहतात. मग या सल्लागारांकडून या योजनांची अंमलबजावणी केली जाते. हि एक प्रकारची फंड विकायची मोहीमच आहे. प्रत्येक फंडला आपला बाजारातील हिस्सा वाढवायचा असतो. आणि यात स्पर्धा खूप आहे. जीवघेणी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विक्रेत्यांना विक्रीचे एक लक्ष ठरवून दिलेले असते. हे लक्ष पूर्ण व्हावं यासाठी अशा योजना काढल्या जातात. या योजनेद्वारे जे सल्लागार जास्तीतजास्त गुंतवणूक मिळवतील त्यांना अतिरिक्त लाभ दिला जातो. यात महागड्या भेट वस्तू देणे, अधिकचे कमिशन देणे, विदेश पर्यटन करवणे आदी प्रलोभने दिली जातात. आणि या लोभापायी हे सल्लागार सामान्य गुंतवणूकदारांना नको असलेले फंड विकत घ्यायला प्रवृत्त करतात. सामान्य माणसाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी फसवतात.


थोड्या दिवसांपूर्वी काही फंडांनी अशीच एक योजना आखली. या योजनेअंतर्गत जर कोणा सल्लागाराने ठरावीक SIPची गुंतवणूक मिळवली तर त्यास प्रशिक्षणासाठी विदेशात पाठवण्याची घोषणा केली. पण सेबीने तातडीने परिपत्रक काढून या फंडांना तसे करण्यापासून रोकले आहे. हा सेबीने सामान्य गुंतवणूकदारांसाठी घेतलेला फार चांगला निर्णय आहे. सेबी जनतेच्या हितासाठी अशी पावलं उचलत आहे हि एक स्वागतार्ह बाब आहे. पण तरीही काही सल्लागार झट्पट पैसे मिळवण्याच्या लालसेपायी किंवा विक्रीचे लक्ष (sales target) साध्य करण्यासाठी चुकीचे फंड गुंतवणूकदारांच्या घशात उतरवत आहेत. यालाच miss-selling असं म्हणल्या जातं. याचा अर्थ आहे:- The act of selling something that is not suitable for the person who buys it. हे नैतिकदृष्ट्या चूक आहे पण रोजच्या व्यवहारात याचा फार मोठ्या प्रमाणावर गैरफायदा उचलल्या जातो हेही तितकंच खरं आहे. त्यामुळेच सल्लागार निवडतांना सामान्य नागरिकांनी जागरूक होणं गरजेचं आहे.


हे सांगतांना आम्हाला अतीशय अभिमान वाटतो आहे कि आम्ही सदैव सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताची काळजी घेत आलो आहोत. आम्ही कधीही कोणत्याही योजनेत भाग घेत नाही. आमच्यापुढे विक्रीचे कोणतेच लक्ष (sales target) नाही. आम्ही कधीच miss-selling च्या फंदात पडत नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याच आमिषाला बळी न पडता फक्त गुंतवणूकदाराच्या हिताचेच निर्णय घेतो आणि घेत राहू.


हेच कारण आहे की आम्ही दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहोत. आम्ही इतरांपेक्षा खरंच वेगळे आहोत का? या प्रश्नाचं उत्तर छातीठोकपणे "हो" हेच आहे. कारण नैतिकता, मूल्ये, विश्वास आणि पारदर्शकता हे आमच्या जीवनातील आदर्श आहेत. पण तरीही तुम्ही यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण हा सारा शेवटी पैश्यांचा व्यवहार आहे. विश्वासाचा मामला आहे. त्यामुळे गुंतवणुकीआधी भेटून, बोलून, आपल्या मनातील सर्व शंकांचं निरसन करून मगच हा निर्णय तुम्ही घ्यावा हाच आमचा सल्ला आहे. आणि तुमचा विश्वास नक्कीच बसेल याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे.


वॉरेन बफे म्हणतात, “It takes 20 years to build a reputation and five minutes to ruin it. If you think about that, you'll do things differently.” हे आमचं ब्रीदवाक्य आहे.

 
 
 

Comments


Stay updated and enhance your wisdom about wealth creation

Thanks for subscribing!

bottom of page