याचसाठी केला होता अट्टाहास ...
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Feb 24
- 1 min read
"गुंतवणूकदारांचे ५ लाख करोड रुपयांचे नुकसान !!!"
"स्टॉक मार्केट मधे धूळधाण !!! “
“५ दिवसात १८ लाख कोटी रुपये स्वाहा !!!"
"बाजार कोविड लेव्हल पर्यंत जाणार का ???"
"Blood bath on Dalal Street !!! "
"Sensex tanked more than 10,000 points in six months !!!"
"More crash on the horizon ???"
उद्या न्युज पेपर मधे किंवा आज रात्री TV वर ह्या हेडलाईन्स नक्कीच झळकतील. पण यामुळे घाबरून जायची गरज नाही. हे एकदम नॉर्मल आहे. वर गेलेलं मार्केट कधी ना कधी खाली पडणारच. हाच बाजाराचा नियम आहे. यात नवीन काहीच नाही. हे असं आधीही खूपदा झालेलं आहे आणि पुढेही होत राहील.
त्यामुळे या मार्केट च्या पडण्याने चिंता करण्याची अजिबात गरज नाही.
सोशल मीडिया, न्युज पेपर्स, TV यावर अशा गोष्टींना मसाला लावून लिहिले, दाखवले जाते. ह्याला भडक रंग देण्यात येतो. यालाच noise असं म्हणतात. यामुळेच बाजारात भिती, fear, panic याचे वातावरण निर्माण होते. सामान्य गुंतवणूकदार याला घाबरून आपला पोर्टफोलिओ विकून टाकतात आणि नुकसान करून घेतात.
यालाच स्टॉक मार्केट मधे इन्वेस्टींग बिहेविअर असं म्हणतात. हे इन्वेस्टींग बिहेविअर कंट्रोल करणे हाच गुंतवणुकीतील सर्वात महत्वाचा भाग आहे.
बाजार पडण्याची शक्यता आम्ही मागील पाच महिन्यापासून वेगवेगळ्या व्हिडिओतून ब्लॉग मधून सांगितलेलीच आहे. ज्यांनी हे ब्लॉग वाचले, व्हिडिओ पहिले त्यांना हे माहिती आहे.
आम्ही मागील चार वर्षांपासून इन्वेस्टींग बिहेविअर वर खूप सारे विडिओ बनवले आहेत, ब्लॉग लिहिले आहेत आणि इन्वेस्टर्स ना जागरूक केलं आहे. स्टॉक मार्केट मधे कसे वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याची वेळोवेळी माहिती दिली आहे. स्टॉक मार्केट मधे किती रिस्क असते आणि ती काय असते हे पदोपदी समजावून सांगितलं आहे.
हि अशी बेअर मार्केटची वेळ लवकरच येणार हे आम्ही जाणून होतो. आणि त्यामुळेच याच अशा खडतर वेळेसाठी आम्ही हा सर्व अट्टाहास केला आहे. या मागचे प्रयोजन हे कि जेंव्हा अशी वेळ येईल तेंव्हा तुमची मानसिक तयारी पूर्णपणे झाली असेल.
यालाच Psychological Warfare असं म्हणतात.
यालाच mindset prepare करणे असं म्हणतात.
डिफेन्सिव्ह इन्वेस्ट्मेन्ट्स चे मुख्य काम हेच आहे आणि ते म्हणजे गुंतवणूकदारांच्या पैश्याची सुरक्षा करणे (defend capital) आणि त्यांचे इन्वेस्टींग बिहेविअर मॅनेज करणे.
आमचं ब्रीद वाक्यच आहे:- “We Manage Your Investing Behavior.”
आणि या सर्व व्हिडिओमुळे, ब्लॉग मुळे आशा आहे तुम्ही आता इन्वेस्टींग बिहेविअर वर कसे कंट्रोल करायचे यात एक्स्पर्ट झाला असाल.
आपण आतापर्यंत बाजारात काय वाईट होऊ शकतं ह्याची थेरी समजून घेतली आहे. आता वेळ आली आहे ती या ज्ञानाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्याची.
हीच ती वेळ सावध राहण्याची ... योग्य निर्णय घेण्याची.
या सर्वांचा मतितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे, बाजारातील चढ-उतार याने घाबरून न जाता, लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक सुरु ठेवणे. आपली आर्थिक उद्दिष्टे, स्वप्ने पूर्ण करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. यावर दुसरा कोणताही पर्याय नाही.
त्यामुळे मार्केटच्या या खाली कोसळण्याला चालून आलेली एक संधी म्हणून पहिले पाहिजे, धैर्याने सामोरे गेले पाहिजे आणि शक्य असेल तर या वेळेस अजून पैसे गुंतवले पाहिजेत.
गुंतवणुकीची हीच ती खरी वेळ आहे...
स्टॉक मार्केट मधे एक म्हणच आहे कि, “The real wealth gets created only in bear market.”
म्हणजे तुम्हाला खरी संपत्ती कमवायची असेल तर ती बेअर मार्केट मधेच कमावता येते.
आणि एकदा का हि वेळ जर निघून गेली तर मग आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही.
.png)


Comments