सेबी आणि डिफेन्सिव्ह इन्वेस्ट्मेन्ट्स
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Mar 2, 2024
- 1 min read
मागच्याच आठवड्यात सेबीने सर्व म्युच्युअल फंडांना एक धोक्याची सूचना केली. सेबीला असं आढळून आलं कि स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांचा पैसा मोठ्या प्रमाणात येत आहे. आणि हा पैश्याचा वेग दर महिन्यात वाढतोच आहे.
गेल्या एकाच वर्षात (FY23-FY24) स्मॉल कॅप फंडातील नेट इनफ्लो रु २२,१०२ करोड वरून जानेवारी २०२४ पर्यंत रु ३७,८७७ करोड पोहोचला आहे. दर महिन्यामध्ये अंदाजे रु २००० करोड गुंतवले जात आहेत.
इतके सारे पैसे फक्त स्मॉल कॅप फंडात येण्याचं कारण हे आहे कि मागील वर्षात या फंडांनी अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. चक्क ५० % च्या वर. आणि तोही एकाच वर्षात.
आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांचा ओघ या स्मॉल आणि मिड कॅप फंडांकडे वाढला आहे. आणि हीच धोक्याची सूचना आहे.
इतका जास्त परतावा मिळणं हा एक निव्वळ अपवाद आहे. आणि सेबीला हेच सांगायचं आहे. सेबीने म्युचुअल फंडांना सल्ला दिला आहे कि त्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करावे. आणि हे ते कशाप्रकारे करणार आहेत याची योजना बनवावी, जेणेकरून किरकोळ गुंतवणूकदारांना नुकसान होणार नाही. मागच्या एक वर्षापासून सेबी सक्रियपणे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करीत आहे. सेबीचे हे पाऊल अतीशय प्रशंसनीय आहे.
स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये संभाव्य धोका काय आहे?
स्मॉल कॅप मध्ये मागील एका वर्षात चांगला परतावा मिळाला आहे, आणि त्या परताव्याच्या मागे लागून गुंतवणूकदार या फंडात निवेश करीत आहेत. आणि त्यांचं बघून इतर गुंतवणूकदारही गुंतवणूक करीत आहेत आणि याचमुळे या फंडात आता एक फुगवटा निर्माण झाला आहे. ज्याला इंग्रजीत आपण “फ्रॉथ” म्हणतो.
जी गोष्ट जितक्या लवकर आणि वेगात वर जाते ती तितक्याच वेगाने खाली येते हा प्रकृतीचा नियम आहे. आणि तो स्मॉल कॅप फंडांनाही लागू होतो.म्हणूनच सेबीने हि धोक्याची सूचना दिली आहे. हि सूचना फक्त म्युचुअल फंडांनाच नाही तर गुंतवणूकदारांनीही यामुळे सतर्क होणे आवश्यक आहे.
हि धोक्याची सूचना सेबीला द्यावी लागली यामागे गुंतवणूकदारही जबाबदार आहेत. हे असं होण्याची तीन मुख्य बिहेविअरल कारणे आहेत. ती म्हणजे :-
१.जास्तीत जास्त परतावा मिळावा हि हाव
२. हर्ड मेन्टॅलिटी आणि
३.स्मॉल कॅप फंडात असलेला धोका न ओळखणे
स्मॉल कॅप फंडातील धोका (risk) हा इतर फंडांपेक्षा कधीही जास्त असतो. म्हणून जेंव्हा बाजार खाली जाईल (जो कधी ना कधी जाणारच!!!) तेंव्हा ह्या गुंतवणूकदारांना जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी समजूतदारपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
अशा जोखमीपासून डिफेन्सिव्ह इन्वेस्ट्मेन्ट्स आपल्या गुंतवणूकदारांचे संरक्षण कसे करते?
पण डिफेन्सिव्ह इन्वेस्टमेन्टच्या गुंतवणूकदारांना या बाबतीत चिंता करायची बिलकुल गरज नाही. कारण आपण जेंव्हा गुंतवणूकिची योजना (investment planning) आखतो तेंव्हाच हे सर्व संभाव्य धोके (probable risks) लक्षात घेतो आणि त्याप्रमाणे म्युच्युअल फंडांचा एक पोर्टफोलिओ बनवतो. हा पोर्टफोलिओ बनवतांना सर्वात जास्त महत्व ह्या संभाव्य धोक्यांना देतो. गुंतवणूकदारांना कोणतीही अवास्तव जोखीम आम्ही घेऊ देत नाही.
प्रत्येकाचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ हा सहा ते सात वेगवेगळ्या प्रकारच्या फंडात विभागलेला असतो. ह्या पोर्टफोलिओ मध्ये ज्या फंडाची निवड करायची आहे ते फंड खालील बाबी लक्षात घेऊन निवडले जातात:-
१. गुंतवणूकदाराची जोखीम घ्यायची क्षमता
२. गुंतवणुकीची उद्दिष्टे
३. गुंतवणुकीचा कालावधी
४. ऍसेट अलोकेशन
५.डायव्हर्सिफिकेशन आणि
६. सर्वात महत्वाचे म्हणजे गुंतवणूकदाराचे व्यक्तिमत्व
आणि सेबीनेही या धोक्याच्या सूचनेद्वारे हेच सांगितलं आहे. सेबीने जे सांगितलं ते आम्ही गेल्या तीन वर्षांपासून पाळतो आहोत. गुंतवणूकदारांचा पैसा हा कष्टाचा, घाम गाळून मिळवलेला पैसा आहे याची आम्हाला सर्वस्वी जाणीव आहे. आणि ते पैसे सुरक्षित कसे राहतील याची काळजी घेणे हेच आमचं नैतिक कर्तव्य आहे.
आज आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे कि आम्ही सेबीच्या पावलावर पाऊल देत आमच्या गुंतवणूकदारांचं हीत जपत आहोत.
आमच्या फक्त नावातच डिफेन्स नाही तर रक्तातही आहे. आणि तशी वेळ आलीच तर अटॅक करायची धमकही आहे.
.png)
Comments